Thursday, January 9, 2020

‘लोकमत’ वृत्तसमूहातर्फे आयोजित सरपंच ऑफ द इअर पुरस्कार वितरण सोहोळ्याला आज मुंबई येथे उपस्थित होतो.


विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:

‘लोकमत’ वृत्तसमूहातर्फे आयोजित सरपंच ऑफ द इअर पुरस्कार वितरण सोहोळ्याला आज मुंबई येथे उपस्थित होतो. माझे सहकारी सुधीरभाऊ मुनगंटीवार, राज्यातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.
सरपंच थेट जनतेतून निवडला जावा, अशी अनेक सरपंचांची इच्छा होती. ग्रामविकासात काम करणार्‍या अनेकांची सुद्धा तीच इच्छा होती. थेट निवडून आलेल्या सरपंचांनी अनेक चांगली कामे केली, हेही निदर्शनास आले. राज्य सरकारने चर्चा करून पुढचा निर्णय घेतला पाहिजे.
आज राज्यातील राजकीय स्थिती बदलली असली तरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा जागांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे.
सारे पक्ष भाजपाविरुद्ध एकत्र येणे हे काही नवीन नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपा विरूद्ध सारे एकत्र अशीच स्थिती होती. पण, अंतिमत: भाजपा हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे येणार्‍या काळात सुद्धा या नव्या राजकीय परिस्थितीत भाजपा अधिक तयारी करेल.
आज महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचा विचार केला तर मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. कामे करायची नसतील, तर सबबी सांगणे वेगळे आहे. पण, गेल्या 25 वर्षांच्या तुलनेत महाराष्ट्रात कामेही मोठी झाली आणि आर्थिक स्थितीही भक्कम झाली.

No comments:

Post a Comment