भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल
PANKAJA GOPINATH MUNDE SPEECH :
भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणी लक्ष्मीबाई टावर चौकात विराट सभा झाली. सभेला भाजपा महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या आपल्या मतदारसंघात दगडापेक्षा वीट मऊ अशी चर्चा आहे. समोरचे दगड असतील पण मी वीट आहे ती विठ्ठलाच्या म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या पायाची. त्यावरचा तोल जाऊ देणार नाही, माझ्यापासून तुम्हाला कधीच धोका होणार नाही. कारण मी कधीच कुणाला खोटे आश्वासन आणि शब्द देत नाही. सज्जन माणसाला भ्याडपणाचा शाप असतो, मी निर्भिड आहे म्हणूनच राजकारणात आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना ज्यांनी यातना दिल्या, त्यांनी त्यांच्या पराभवासाठी वाट्टेल ते आरोप केले एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत प्रितमताई यांनी गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावण्यावर दुसर्याकडून आक्षेप घ्यायला लावला आणि आता तेच त्यांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत, अशा नाटकांना जनता बळी पडणार नाही. स्वतःच्या कार्यकर्त्यांना भर सभेत दम देणारे हे जनतेला काय आधार देणार? परळी मतदार संघाचे मी कवच आहे, इथल्या जनतेला सुरक्षा आणि विकास देईल, त्यांचा स्वाभिमान जपेल.
माझा चेहरा पंकजा नाही तर गोपीनाथ मुंडेंचा आहे. मी दररोज गोपीनाथ मुंडे जगते म्हणूनच स्वाभिमानी आहे. भावनेच राजकारण करते म्हणून आमच्यावर टीका करणारे आपला शब्द पावलोपावली बदलतात. लोकसभेच्या वेळी मराठा समाजाला जात बघा म्हणणारे आता कोणते आवाहन करणार आहेत? ज्यांना चार चार वेळा पराभवाची धुळ चारली ते लोक आज राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांच्या पायगुणामुळेच आज त्या पक्षाची वाईट अवस्था झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या खात्याच्या कामाचे कौतुक केले, मी विकासासाठी वचनबद्ध आहे. साहेबांचा जनसेवेचा वसा आणि वारसा मी चालवणार आहे. आज विकासाची गंगा थेट सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. विरोधक पडले तरी आमदारच राहणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत सत्पात्री मतदान करून मला आशीर्वाद द्या असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी बोलताना मी रिपाईंचे जेष्ठ नेते दिवंगत धम्मानंद मुंडे यांची आठवण काढली. शेरोशायरीने सुरू होणारे त्यांचे भाषण प्रेरणादायी असायचे असे सांगून मी मुद्दाम त्यांच्या मुलाला फोन केल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment